पावसाळ्यात आवर्जून खा भुट्टा! चवदारच नाही तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर
Mayuri Gawade
पावसाळा आणि गरमागरम भुट्टा... चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर आहे.
स्वीटकॉर्नमध्ये भरपूर सॉल्युबल फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात स्वीटकॉर्नचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.
स्वीटकॉर्नमधील ल्युटीन आणि झिअॅक्सॅन्थिन हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात.
रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करणारे पोषक घटक स्वीटकॉर्नमध्ये आढळतात, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही आधार मिळू शकतो.
व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6 आणि फोलेटचा उत्तम स्रोत असल्याने स्वीटकॉर्न शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करतो.
पावसाळ्यात गरमागरम उकडलेला किंवा भाजलेला भुट्टा हा चव आणि पोषणाचा उत्तम संगम ठरू शकतो.
स्वीटकॉर्न खाताना त्यावर जास्त बटर, चीज, मेयोनीज किंवा मीठ टाकणं टाळा, म्हणजे त्याचे आरोग्यदायी फायदे टिकून राहतील.
संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात स्वीटकॉर्न खाल्ल्यास त्यातील पोषक घटकांचा अधिक फायदा मिळू शकतो. | All Photos : Ai Generated