पावसाळ्यासाठी छत्री घेताय? खरेदीपूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा
किशोरी घायवट-उबाळे
मजबूत फ्रेम निवडा - फायबर किंवा स्टेनलेस स्टील फ्रेम असलेली छत्री निवडा. ती जोरदार वारा आणि मुसळधार पावसातही टिकाऊ ठरते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
वॉटरप्रूफ कापड तपासा - पॉलिस्टर किंवा पाँजी (Pongee) फॅब्रिकची छत्री पाणी झटकन खाली सोडते आणि लवकर सुकते.
रोज प्रवास करत असाल तर फोल्डिंग छत्री सोयीची. मात्र, जोरदार पावसासाठी लाँग छत्री अधिक मजबूत ठरते.
रबर किंवा नॉन-स्लिप ग्रिप असलेले हँडल निवडा. त्यामुळे ओल्या हातांनीही छत्री हातातून निसटत नाही.
स्वस्ताच्या नादात निकृष्ट छत्री घेऊ नका. दर्जेदार साहित्य आणि ब्रँडची वॉरंटी तपासूनच खरेदी करा
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)