ब्लॉक प्रिंट आणि हातमागाच्या साड्या आवडतात? मग 'हे' कलेक्शन बघाच!

Tejashree Gaikwad

मृदा या ब्रँडन नुकतेच भारताच्या पारंपारिक हातमाग कारागिरांना प्रोत्साहन देत त्यांचे बुलबुल कलेक्शन लॉन्च केले आहे. | @mrida.co/ Instagram
हे कलेक्शन म्हणजे हातमागावर विणलेल्या माहेश्वरी साड्यांची ही उत्कृष्ट श्रेणी आहे. | @mrida.co/ Instagram
उत्कृष्ट प्रतीच्या सुती रेशमाने तयार केलेली, बुलबुल कलेक्शनमधील प्रत्येक साडी अतिशय हलकी आणि त्वचेसाठी सॉफ्ट अशी आहे. | @mrida.co/ Instagram
ताजे आणि मातीशी मिळते-जुळते रंग, फिकट रंगसंगती आणि आकर्षक रंगछटांनी तयार झालेला मृदा बुलबुल कलेक्शन ऋतूला पूरक असे आहे. | @mrida.co/ Instagram
बुलबुल कलेक्शन बुलबुल पक्ष्याचा उबदार आवाज, चपळ स्वभाव आणि माणसांच्या सहवास हे सर्व दर्शवते. | @mrida.co/ Instagram
या कलेक्शनची प्रत्येक साडी बोहेमियन स्टाईलने डिझाईन केली गेली आहे. | @mrida.co/ Instagram
या साड्या आजच्या काळातील त्या सर्व महिलांचे लक्ष वेधून घेणार आहेत कारण या बोल्ड आणि स्टायलिश लूक देतात. | @mrida.co/ Instagram
बुलबुल कलेक्शनच्या साड्या तुम्ही रोजच्या वापरातही सहज वापरू शकता. | @mrida.co/ Instagram
लॉन्चची घोषणा करताना, मृदा सारीसच्या सह-संस्थापक श्रिया नागी म्हणाल्या, बुलबुल कलेक्शन म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ आहे. हँडब्लॉक प्रिंट आणि बाग प्रिंटच्या नैसर्गिक रंगांसह आम्ही पारंपारिक प्रक्रिया कायम ठेवली आहे. | @mrida.co/ Instagram