Mrunal Thakur : पारंपरिक लूकला ग्लॅमरस ट्विस्ट; अभिनेत्री मृणाल ठाकूरचा क्लासी अंदाज सोशल मीडियावर चर्चेत
Mayuri Gawade
रॉयल ऑरेंज अनारकलीमध्ये मृणाल ठाकूरचा हा लूक अक्षरशः नजरा खिळवून ठेवतो.
पारंपरिक अनारकलीसोबत बॅकलॅस डिझाइनची जोड देत मृणालने एथनिक फॅशनला हटके ट्विस्ट दिला.
सोनसळी एम्ब्रॉयडरी आणि फ्लोरल डिटेलिंगमुळे अभिनेत्रीचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसला.
क्रीम दुपट्ट्यामुळे ऑरेंज अनारकलीचा रंग आणखी खुलून आला आहे.
मोठे झुमके, मांगटिक्का आणि स्टेटमेंट ज्वेलरीमुळे मृणालचा ‘रॉयल दिवा’ अंदाज पाहायला मिळाला.
सॉफ्ट ग्लॅम मेकअप आणि स्मोकी आयजमुळे अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुललं.
पांढऱ्या गजऱ्याने सजवलेल्या बन हेअरस्टाइलने तिच्या लूकला पारंपरिक टच मिळाला.
एलिगन्स आणि ग्लॅमरचा परफेक्ट मेळ साधत मृणालचा हा एथनिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. | Instagram : Mrunal Thakur