रूप असं की पाहताच क्षणी प्रेमात पडाल! तिरुमलात मृणाल ठाकूरचा साडीतील सोज्वळ लूक, पाहा खास Photos

Mayuri Gawade

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या पारंपरिक लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल नेहमीच तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते.
तिरुमला येथील खास फोटोंमध्ये तिने क्रीम आणि गुलाबी रंगाची आकर्षक रेशमी साडी परिधान केली आहे.
साडीवरील सोनेरी काठ तिच्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही आणि उठावदार लूक देताना दिसतो.
साडीला साजेसा गुलाबी रंगाचा नाजूक विणकाम असलेला ब्लाऊज तिच्या लूकला अधिक देखणा बनवतो.
कानात जड सोन्याची झुमकी आणि हातातील साध्या बांगड्यांनी तिच्या पारंपरिक अवतारात भर घातली आहे.
कपाळावरील छोटी टिकली आणि मोकळे सोडलेले केस तिच्या सात्त्विक सौंदर्याला अधिक खुलवत आहेत.
साडीपासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट परफेक्ट जुळवून तिचा संपूर्ण लूक अत्यंत संतुलित आणि आकर्षक दिसतो.
या पारंपरिक आणि साध्या अवतारामुळे तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (मृणाल ठाकूर)