हिरवा लेहेंगा अन् गुलाबी बांगड्या; 'सा रे ग म प' साठी मृण्मयी देशपांडेचा सुंदर लूक, पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
'सा रे ग म प'चं नवं पर्व सुरू - झी मराठीवर 'सा रे ग म प'च्या नव्या सीझनची सुरेल मैफिल आजपासून रंगणार आहे. | (All Photos- Instagram)
मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालक - या सीझनची सूत्रसंचालक म्हणून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे.
पहिल्या भागासाठी खास लूक - मृण्मयीने पहिल्या भागासाठी हिरव्या रंगाचा सुंदर डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
गुलाबी बांगड्यांनी लूकला चार चाँद - हिरव्या लेहेंग्यासोबत मृण्मयीच्या हातातील गुलाबी बांगड्या विशेष उठून दिसत होत्या.
अवधूत गुप्ते परीक्षकाच्या भूमिकेत - गायक-संगीतकार अवधूत गुप्ते पुन्हा एकदा या सुरांच्या मंचावर परीक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहेत
वैशाली सामंतही परीक्षक - लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांचीही परीक्षक म्हणून या सीझनमध्ये असणार आहेत.
संगीतप्रेमींची उत्सुकता वाढली - मृण्मयीचा खास लूक, अनुभवी परीक्षक आणि नव्या स्पर्धकांच्या आवाजामुळे नव्या पर्वाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
पुन्हा रंगणार सप्तसुरांची जादू - नवे स्पर्धक, नवी गाणी आणि सुरांची जुगलबंदी यामुळे 'सा रे ग म प'चा हा सीझन खास ठरणार आहे.