Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबई फिरायचीये? मग 'या' चर्चना भेट द्यायला विसरू नका

Mayuri Gawade

ख्रिसमसच्या काळात मुंबई हे फिरण्यासाठी अत्यंत खास ठिकाण मानले जाते.
या पवित्र आणि आनंददायी प्रसंगी, मुंबईतील प्रसिद्ध चर्च ज्यांना नक्की भेट दिली पाहिजे .
माउंट मेरी चर्च (बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट) - माउंट मेरी चर्च, ज्याला बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट असे म्हटले जाते, हे वांद्रे येथील एक प्रसिद्ध रोमन कॅथोलिक तीर्थस्थान आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. | Mount Mary Church website
सेंट थॉमस कॅथेड्रल - सुमारे ३०० वर्षे जुने असलेले सेंट थॉमस कॅथेड्रल हे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या मुंबई अँग्लिकन डायोसीजचे कॅथेड्रल चर्च आहे. सेंट थॉमस द अपोस्टल यांच्या सन्मानार्थ या चर्चला हे नाव देण्यात आले आहे. हॉर्निमन सर्कल येथे वसलेले हे मुंबईतील सर्वात जुने चर्च मानले जाते. | Instagram (beyond_heritage)
कॅथेड्रल ऑफ द होली नेम - कॅथेड्रल ऑफ द होली नेम हे कुलाबा येथील एक रोमन कॅथोलिक कॅथेड्रल आहे. हे चर्च ब्रिटिश स्थापत्यकारांना आवडणाऱ्या गॉथिक रिव्हायव्हल शैलीत बांधण्यात आले आहे. | Tripadvisor
सेंट मायकेल्स चर्च - माहीममधील सेंट मायकेल्स चर्च हे मुंबईतील सर्वात जुन्या कॅथोलिक चर्चपैकी एक आहे. हे चर्च पोर्तुगीज काळातील आजही अस्तित्वात असलेल्या सर्वात जुन्या वास्तूंमध्ये गणले जाते. | Reddit
सेंट अँड्र्यूज चर्च - वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज चर्च हे पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक चर्च म्हणून ओळखले जाते. याची स्थापना जेसुइट पाद्र्यांनी १५७५ साली केली होती. | Tripadvisor
अफगाण चर्च (चर्च ऑफ सेंट जॉन द इव्हॅंजेलिस्ट) - कुलाबा येथील अफगाण चर्च, ज्याला चर्च ऑफ सेंट जॉन द इव्हॅंजेलिस्ट असेही म्हणतात, हे गॉथिक रिव्हायव्हल शैलीतील ऐतिहासिक अँग्लिकन चर्च आहे. पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे चर्च उभारण्यात आले आहे. | Instagram ( ompsyram )