Ganeshotsav 2026 : मुंबईच्या 'या' प्रसिद्ध गणपतींची महतीच वेगळी; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

किशोरी घायवट-उबाळे

लालबागचा राजा - नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची देशभरात विशेष ओळख आहे.
गणेश गल्लीचा राजा - मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक म्हणून गणेश गल्लीच्या गणपतीचे विशेष महत्त्व आहे.
मुंबईचा राजा - सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली भव्य मूर्ती आणि पारंपरिक पूजाविधीसाठी हा गणपती प्रसिद्ध आहे.
खेतवाडीचा गणराज - दरवर्षी आकर्षक आणि भव्य सजावटीमुळे खेतवाडीचा गणराज भाविकांचे लक्ष वेधून घेतो.
अंधेरीचा राजा - मुंबईतील लोकप्रिय गणपतींपैकी एक असलेल्या अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते.
गिरगावचा राजा - पारंपरिक गणेशोत्सव आणि मराठमोळ्या वातावरणामुळे गिरगावच्या गणपतीला विशेष मान मिळतो.
टिटवाळा महागणपती - मुंबईजवळील प्रसिद्ध गणेशक्षेत्रांपैकी एक असून, नवस आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविक येथे दर्शनाला येतात.
या गणपतींच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक - भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, जुनी परंपरा आणि नवसाची श्रद्धा यामुळे मुंबईतील हे गणपती विशेष लोकप्रिय आहेत.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)