कुणी सिंहावर तर कुणी मोरावर... मुंबईच्या गणपती आगमन सोहळ्यातील खास झलक पाहा

Mayuri Gawade

मुंबईत गणेश आगमनाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. १६ ऑगस्टला लालबाग-परळसह विविध भागांत दाखल झालेल्या बाप्पांच्या भव्य आणि आकर्षक मूर्तींनी भाविकांचं लक्ष वेधून घेतलं.
पाहूया या आगमन सोहळ्यातील काही खास झलक...
फोर्टचा राजा - फोर्टचा राजा यंदा सिंहाच्या भव्य आसनावर राजेशाही थाटात विराजमान झाला असून, मागील बाजूस देवीची आकर्षक प्रतिमा पाहायला मिळत आहे. | Insta | ekbhaktofficial
काळाचौकीचा महागणपती - सिंहावर दोन्ही पाय हवेत ठेवून तोल सांभाळणाऱ्या काळाचौकीच्या महागणपतीची हटके रचना भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. | Insta | ekbhaktofficial
खेतवाडीचा राजा - आकर्षक फुलांनी सजवलेल्या भव्य रूपातील खेतवाडीचा राजा हातात पारंपरिक वाद्य घेतलेल्या अंदाजात पाहायला मिळत आहे. | Insta | ekbhaktofficial
वलसाडचा सम्राट - सुंदर सजवलेल्या मोरावर पत्नीसमवेत विराजमान झालेला वलसाडचा सम्राट आपल्या आकर्षक रूपामुळे आगमन सोहळ्यात उठून दिसत आहे. | Insta | parthhclickss
मुंबईचा सम्राट - भव्य सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालेल्या मुंबईच्या सम्राटामागे भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा असून, संपूर्ण देखावा राजेशाही आणि भक्तिमय दिसत आहे. | Insta | mumbaiche_ganpati
मुंबईतील गणेश आगमन सोहळ्याचा जल्लोष दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात आणखी अनेक प्रसिद्ध मंडळांचे बाप्पा मुंबईत दाखल होणार असून, भाविकांना त्यांच्या भव्य रूपाचं दर्शन घेता येणार आहे. | Instagram