Ganeshotsav 2025 : मुंबईत भक्तांचा जनसागर; पाहा गणेश विसर्जनाचे क्षण
नेहा जाधव - तांबे
आज अनंत चतुर्दशी; दहा दिवस भक्तांच्या सानिध्यात राहून बाप्पा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. | (Photo - Insta/_atharva_jadhav)
आपल्या लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देण्यासाठी मुंबापुरी देखील सज्ज झाली आहे. | (Photo - Insta/_atharva_jadhav)
मुंबईमध्ये उंच इमारतींसारखेच मोठ मोठ्या उंच गणेशमुर्तींचे आकर्षण. | (Photo - Insta/_atharva_jadhav)
त्यातही मुंबईचा शिरोमणी नवसाला पावणारा लालबागचा राजाचे आकर्षण जास्तच. आज तोही विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. | (Photo - Insta/_atharva_jadhav)
मुंबईचा सर्वात जुना आणि मानाचा गणपती म्हणजे मुंबईचा राजा. गणेश गल्लीच्या गणपतीने सकाळीच मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत हजेरी लावली आहे. | (Photo - Insta/Creativr_pixel10)
मुंबईचे आणखी एक आकर्षण असणाऱ्या तेजुकाय गणपती भक्तीच्या सागरात आणि गुलालाच्या वर्षावात न्हाऊन निघत आहे. | (Photo - Insta/gnapati_bappa_morya)
बॅलन्सचं अद्भुत दर्शन देणाऱ्या परळच्या राजानेही आपला मंडप सोडून परतीचा प्रवास पकडला आहे. | (Photo - Insta/Ganrya_maza_Official)
मुंबईकर मात्र, साश्रू नयनाने या सर्व महाकाय गणेशाला निरोप देण्यासाठी भक्तीच्या अथांग सागरात एकवटला आहे. | (Photo - Insta/Click_it_Kartik)
सर्वात धावपळीचे आयुष्य जगणारी मुंबई वेळ काढून दहा दिवस गणपतीची मनोभावे सेवा करते. तितक्याच उत्साहात कामं सांभाळून आज हीच मुंबई भरल्या मनाने आपल्या आवडत्या राजांना निरोप देत आहे.. तेही पुढच्या वर्षी परत या म्हणतच..! | (Photo - Insta/chalta_firta)