मुंबई लोकल - नकळत जुळणाऱ्या नात्यांचा उलगडणारा प्रवास
नेहा जाधव - तांबे
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांचा ओघ कायमच रसिकांना भुरळ घालत आला आहे. अशाच एका नव्या आणि हृदयस्पर्शी कथानकाचा अनुभव देणाऱ्या ‘मुंबई लोकल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आला आहे.
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी या चित्रपटातून प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. | (Photo - Insta/Prathamesh Parab)
येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे | (Photo - Insta/Prathamesh Parab)
‘मुंबई लोकल’ चित्रपटात दैनंदिन प्रवासातून निर्माण होणाऱ्या नात्यांचे आणि फुलणाऱ्या प्रेमाच्या प्रवासाचे सुंदर चित्रण वेगळ्या अंदाजात करण्यात आले आहे. | (Photo - Insta/Prathamesh Parab)
मालिकेतील लाडक्या अप्पूला चित्रपटात पाहून प्रेक्षकही खूप खुश झाले आहेत. | (Photo - Insta/Dnyandaramtirthitkar)
टाइमपास चित्रपटातून घरोघरी पोहचलेला प्रेमवीर दगडू आता पुन्हा मुंबईतील एका प्रेमकथेत प्रेक्षकांना भेटणार आहे. | (Photo - Insta/Prathamesh Parab)
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि अभिजीत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती निलेश राठी, प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी केली आहे. | (Photo - Insta/Dnyandaramtirthitkar)
डब्यातले काही क्षण, नजरानजर, आणि हलक्याफुलक्या गप्पांतूनच प्रेमाची नाजूक सुरुवात होते, आणि अशाच विलक्षण प्रवासाची अनुभूती प्रेक्षकांना ‘मुंबई लोकल’ या आगामी मराठी चित्रपटातून मिळणार आहे. | (Photo - Insta/Prathamesh Parab)