ऑक्टोबर हिट टाळा! महाराष्ट्रातील 'ही' थंड हवेची ठिकाणे अजिबात मिस करू नका

Mayuri Gawade

कामशेत - ‘पॅराग्लायडिंगचा स्वर्ग’ म्हणून ओळखलं जाणारं कामशेत हे डोंगरांच्या जवळ असल्याने येथे चांगली हवा आणि सुंदर दृश्ये पाहायला मिळतात, ज्यामुळे ते थंड वातावरणात आराम करण्यासाठी योग्य आहे.
लोणावळा आणि खंडाळा : हे जुळे हिल स्टेशन सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. जिथे थंड हवामान आणि सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. येथे शांत वातावरणात विश्रांती घेता येते.
माथेरान : आशियातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण आहे. येथून आपण चालत किंवा घोड्यावर स्वार होऊन हिल स्टेशनचा आनंद घेऊ शकतो.
दूरशेत : हे ठिकाण ॲडवेंचर, ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींना आवडेल. हे सह्याद्रीच्या कुशीत आणि आंबा नदीजवळ वसलेले आहे.
मुळशी धरण : मुळा नदीवर बांधलेलं हे धरण पर्यटनासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. येथे सुंदर निसर्ग, डोंगरं आणि तलाव आहेत, आणि बोटिंग, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येतो.
माळशेज घाट : धुके आणि ढगांनी भरलेले डोंगर, धबधबे आणि पक्षी पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर माळशेज घाट हे ठिकाण उत्तम आहे.
कर्जत : उल्हास नदीच्या काठावर वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण रिसॉर्ट्स, फार्म-स्टे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. | शीलू चौधरी
अलिबाग : अनेक शांत समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे किनारपट्टीवरील शहर आहे. येथील समुद्राचा गारवा आणि किनाऱ्यावरील वातावरणामुळे शहराच्या उकाड्यापासून दिलासा मिळतो.
कर्नाळा : कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षण करणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. येथील दाट जंगल आणि थंड वातावरण मनःशांती देणारे आहे.
ताम्हिणी घाट: मुळशी आणि ताम्हिणी दरम्यान, पश्चिम घाटाच्या डोंगरशिखरावर स्थित. सुंदर धबधबे, तलाव आणि दाट अरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाठी भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर सर्वोत्तम कालावधी आहे.