देवबाप्पा आले...मुंबईत पहिल्या गणपतीचे आगमन; पहा सुंदर फोटो

नेहा जाधव - तांबे

मुंबईकर वर्षभर ज्या क्षणाची वाट बघतो, तो क्षण आता जवळ आला आहे.
मुंबईकरांची प्रतीक्षा संपली असून मुंबईतील पहिल्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. | Photo - Insta (_ganadhishay_)
आषाढी एकादशी दिवशी ६ जुलै रोजी मुंबईतील परळ येथील 'गणाधीशाय' बाप्पाचे स्वागत मोठ्या जल्लोषात | Photo - Insta (_ganadhishay_)
दरवर्षी मोठ मोठ्या मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते. परळमधील सुरतच्या गणपती मंडळाने बाप्पाचे धुमधडाक्यात स्वागत केले. | Photo - Insta (_ganadhishay_)
यावेळी लाडक्या गणपती बाप्पाला पाहण्यासाठी लहानग्या लेकरांपासून सर्वांनीच गर्दी केली होती. | Photo - Insta (_ganadhishay_)
ही मूर्ती क्रिष्णल आर्ट्सचे मूर्तिकार अरुण दात्ते यांनी साकारली आहे. | Photo - Insta (_ganadhishay_)