बिर्याणी आवडते? मग ट्राय करा हे भन्नाट बिर्याणी प्रकार
Mayuri Gawade
भारतातील खाद्यसंस्कृती म्हटलं की बिर्याणीचं नाव अगदी हमखास घ्यावंच लागतं.
| सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
प्रत्येक राज्याची बिर्याणी ही तिच्या चवीसाठी, मसाल्यांसाठी आणि खास परंपरेसाठी प्रसिद्ध आहे.
चला तर जाणून घेऊया संपूर्ण भारतात लोकप्रिय असलेल्या बिर्याणी प्रकारांबद्दल...
हैदराबादी बिर्याणी - ही भारतातील सर्वांत लोकप्रिय बिर्याणींपैकी एक आहे. ही बिर्याणी अरबी, तुर्किये आणि मुघल खाद्यसंस्कृतीचा प्रभाव दाखवते.
लखनवी बिर्याणी- उत्तर भारतातील ही बिर्याणी मुघल काळातील अवधी स्वयंपाक पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
कोलकाता बिर्याणी - ही हलक्या मसाल्यांसह मांस, बटाटे, आणि उकडलेली अंडी यांचा परिपूर्ण मेळ आहे. नाजूक मसाले आणि गुलाब पाण्याचा सुगंध ही या बिर्याणीची वैशिष्ट्ये आहेत.
तंजावूर बिर्याणी - तामिळनाडूमधील मसाल्यांच्या अनोख्या चवीसाठी ही बिर्याणी प्रसिद्ध आहे. ही प्रामुख्याने कोळंबी, मासे किंवा मटणासोबत तयार केली जाते आणि नारळ दूध वापरल्यामुळे याची चव आणखी कमाल लागते.
अंबूर बिर्याणी - ही तामिळनाडूतील आणखी एक खास बिर्याणी आहे. या बिर्याणीला मांस मसाल्यात तांदळासोबत शिजवले जाते, ज्यामुळे ती चविष्ट आणि वेगळी लागते.
मलबार बिर्याणी - ही बिर्याणी केरळच्या किनारी भागातील खास पदार्थ आहे. यामध्ये सुकामेवा, नारळ दूध, आणि केशर यांचा वापर होतो.
दम बिर्याणी - ही मध्य भारतात प्रसिद्ध आहे. या बिर्याणीला बंद भांड्यात मंद आचेवर शिजवले जाते.