नेलपेंट लावायला आवडतं? सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Krantee V. Kale

अनेक महिलांना नखांवर नेल पेंट लावायला आवडतं. काही जण यावर नेल आर्ट देखील करतात. | All Photos- Yandex
परंतु, सतत नेलपेंट लावल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.
नेलपेंटमधील केमिकलमुळे तुमची नखं कमकुवत होऊ शकतात आणि तुटू शकतात.
नेलपेंटचा सतत वापर केल्याने नखे पिवळी पडतात. ज्यामुळे नखांच्या सौंदर्यावर परिणाम होतो.
काही नेल पेंटमध्ये टोल्युइन आणि फॉर्मेल्डिहाइडसारखी केमिकल असतात. या केमिकल्समुळे खोकला, दमा आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.
नेलपेंट आणि नेल रिमूव्हरमधील केमिकलमुळे अॅलर्जी होऊ शकते किंवा पुरळ येऊ शकतात. तसेच, हाताची त्वचा लाल होऊन खाज सुटू शकते.
जर नखांवर नेलपेंट बराच काळ राहिली किंवा जुनी पॉलिश काढली नाही तर नखांमध्ये बुरशी आणि संसर्गाचा धोका वाढतो.
केमिलयुक्त नेलपेंट सतत नखांवर लावल्याने लिव्हर, किडनी आणि इतर अवयवांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. तसेच कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)