सिंधुदुर्गातील 'या' प्रसिद्ध धबधब्यावर साकारण्यात आलाय राज्यातील पहिला काचेचा पूल

नेहा जाधव - तांबे

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात वैभववाडी स्टेशनपासून फक्त ११ किमी अंतरावर नापणे-शेर्पे निसर्गरम्य धबधबा आहे. | (Photo - Insta @sarvesh Pednekar)
नापणे आणि शेर्पे या दोन गावांच्या मध्ये वसलेला हा बारमाही धबधबा कोकणाचे सौंदर्य आहे. ८० ते ९० फुट उंच असलेला हा धबधबा तितका खोल देखील आहे. | (Photo - Neha Jadhav)
या धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. | (Photo - Insta @sarvesh Pednekar)
या काचेच्या पूलासाठी सिंधुरत्न योजनेतून ९९ लाख ६३ हजारांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. | (Photo - Insta @sarvesh Pednekar)
या काचेच्या पूलामुळे नापणे धबधब्याच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. हा पारदर्शक काचेचा पूल पर्यटकांना थरारक आणि अनोखा अनुभव देणार आहे. | (Photo - Insta @sarvesh Pednekar)
या धबधब्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. | (Photo - Neha Jadhav)
शांत वाहणारे पाणी, पक्ष्यांचे आवाज यामुळे हा धबधबा पर्यटकांचे मन वेधून घेतो. | (Photo - Neha Jadhav)
काचेच्या पूलामुळे या धबधब्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. | (Photo - Neha Jadhav)