नारळी पौर्णिमेसाठी गोड मेजवानी; 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा

किशोरी घायवट-उबाळे

नारळी भात - गोड, सुगंधी आणि नारळाच्या स्वादाने भरलेला नारळी भात नारळी पौर्णिमेचा खास पदार्थ.
नारळी पाक - ताजा नारळ आणि साखरेपासून तयार होणारा हा पारंपरिक गोड पदार्थ नैवेद्यासाठी आवडीने केला जातो.
ओल्या नारळाच्या करंज्या - खुसखुशीत करंजी आणि नारळ-साखरेचे गोड सारण ही खास मेजवानी.
नारळाच्या वड्या - कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या नारळाच्या वड्या सणासाठी उत्तम पर्याय.
नारळाची खीर - दूध, नारळ आणि साखरेपासून तयार केलेली स्वादिष्ट खीर नैवेद्याची रंगत वाढवते.
नारळाची चटणी - ताज्या नारळापासून तयार केलेली चटणी जेवणात चवदार तडका देते.
नारळाच्या पोळ्या - गोड नारळाचे सारण भरून तयार केलेली पोळी सणासुदीच्या ताटाची खासियत.
नारळाची बर्फी - नारळ आणि दूध किंवा खव्यापासून तयार होणारी बर्फी गोड पदार्थांच्या यादीत हमखास असते.
नारळाचे लाडू - ताजा नारळ आणि गुळापासून तयार केलेले लाडू नारळी पौर्णिमेसाठी सोपे आणि स्वादिष्ट ठरतात.
नारळाच्या घाऱ्या - नारळाच्या सारणाने भरलेला हा पारंपरिक पदार्थ चहासोबतही छान लागतो.
नारळाचे हे पदार्थ यंदाच्या रक्षाबंधनला नक्की करून पाहा.