पंतप्रधान नरेंद्र मोदी करोडपती? नेमकी किती आहे संपत्ती?

Suraj Sakunde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच दिवसांपूर्वी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींकडं ३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.
पंतप्रधानांनकडं एकूण ५२,९२० रुपये रोख आहेत. स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत ७३,३०४ रुपये आहेत. तर एसबीआयच्या वाराणसी शाखेत फक्त ७००० रुपये त्यांच्या नावावर जमा आहेत.
पंतप्रधान मोदींच्या नावावर एकूण २ कोटी ८५ लाख, ६० हजार ३३८ रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्टेट बँकेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं स्वत:च्या मालकीचं कोणतंही घर तसंच वाहन नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचं साधन हे त्यांना सरकारकडून मिळणारा पगार आणि सेविंग्सवरील व्याज हे आहे.
मोदींनी २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षात ३ लाख ३३ हजार १७८ हजार रुपये इतका इनकम टॅक्स भरला आहे.