पावसाळ्यातील सुपरफूड! नासपती खाल्ल्याने पचनापासून हृदयापर्यंत होतात अनेक फायदे

Mayuri Gawade

पावसाळ्यात बाजारात ताजी आणि रसाळ नासपती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
नासपतीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक भरपूर असतात.
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नासपतीचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.
या फळातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
नासपतीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रणासाठी नासपती उपयुक्त मानली जाते.
नासपतीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.
नैसर्गिक गोड चवीमुळे लहान मुलांनाही नासपती आवडीने खाता येते.
देठाजवळ किंचित मऊ आणि सुगंधी वाटणारी नासपती खाण्यास योग्य असते.
पावसाळ्यात चव आणि आरोग्याचा मेळ साधायचा असेल, तर नासपतीचा आहारात नक्की समावेश करा. | All Photo : Ai generated