नथ आणि 'ती' : फक्त सौंदर्यच नव्हे, तर आरोग्याचं लेणं!

नेहा जाधव - तांबे

हिंदू धर्मात स्त्रियांनी नथ घालणे ही केवळ सौंदर्यवृद्धी नसून अनेक शतकांपासून सुरू असलेली एक पवित्र परंपरा आहे, जे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. | (Photo - FB/sonaleekulkarni)
नथ केवळ सौंदर्याच्या दृष्टीने नव्हे तर वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टीने स्त्रियांसाठी उपयुक्त अलंकार आहे. | (Photo - FB/urmilakothare)
नाकात नथ घालण्याची परंपरा असूनही बहुतांश महिलांना त्यामागील खरे महत्त्व माहिती नसते. चला तर मग, नथ घालण्यामागची धार्मिक, आरोग्यदायी आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया. | (Photo - FB/Tejaswinipandit)
शरीरातील ऍक्युप्रेशर पॉईंट्सपैकी एक पॉईंट डाव्या नाकपुडीशी संबंधित असतो. त्या ठिकाणी नथ टोचल्याने रक्तदाब संतुलित राहतो आणि वातदोष नियंत्रित होतो. | (Photo - FB/Prarthanabehare)
नाकाच्या डाव्या बाजूला टोचल्याने पाळीचे चक्र संतुलित राहते आणि त्रास कमी होतो. | (Photo - FB/Prajktamali)
नाकपुडीतील बिंदू प्रजनन अवयवांशी जोडलेले असल्याने नथ घालण्यामुळे प्रसूतीदरम्यान वेदना कमी होतात. यामुळे प्रसूती अधिक सुलभ व नैसर्गिकरीत्या होण्यास मदत होते. | (Photo - FB/Prajktagaikwad)
नथमुळे नाकातील मज्जातंतूंना उत्तेजन मिळते, जे गर्भाशयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. हे स्त्रियांच्या प्रजनन स्वास्थ्याला मजबुती देण्यास मदत करते. | (Photo - FB/amrutakhanvilakar)
नाक टोचल्याने मेंदूशी संबंधित ऍक्युप्रेशर पॉईंट सक्रिय होतो, त्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो. हे डोकेदुखीवर नैसर्गिक उपाय म्हणून प्रभावी ठरते. | (Photo - FB/Prarthanabehare)
नाकाच्या डाव्या बाजूच्या छिद्रामुळे श्वसन मार्ग खुला राहतो आणि सायनसचा त्रास कमी होतो. | (Photo - FB/shrutimarathe)
सौंदर्यात भर घालणारा हा दागिना स्त्रियांच्या आरोग्याचीही खास काळजी घेतो. फक्त चेहऱ्याचं नव्हे, तर संपूर्ण आरोग्य टिकवण्यासाठी नथीचा मोठा वाटा आहे. | (Photo - FB/Ashwinimahanagade)