मस्कराला करा 'बाय-बाय'! फक्त १ महिन्यात पापण्यांमध्ये जादू, नैसर्गिक लुकसाठी 'सीक्रेट' मास्क
नेहा जाधव - तांबे
पापण्या दाट, लांब आणि मजबूत बनवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर सर्वोत्तम पर्याय आहे. | (Photo - All Canva)
रोजच्या थोड्याशा काळजीने तुम्हीही नैसर्गिकरीत्या आकर्षक लूक मिळवू शकता.
दोन चमचे एरंडेलचे तेल मंद आचेवर पाच मिनिटं गरम करा आणि गार होऊ द्या. यातील अँटीऑक्सिडंट्स पापण्यांचे रोम मजबूत करतात.
एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून त्यातील जेल बाहेर काढा आणि तेलात मिसळा. हे पापण्या मऊ, निरोगी आणि लवचिक ठेवते.
कोरफडीचे ताजे जेल काढून या मिश्रणात फेटा. कोरफड पापण्यांना ओलावा देऊन त्यांची वाढ वाढवते.
एका चमचा पेट्रोलियम जेली घालून चांगले मिसळा. याने पापण्या गळत नाहीत आणि अधिक दाट दिसतात.
ब्रशने पापण्या स्वच्छ करून हे मिश्रण लावा. स्वच्छतेमुळे पोषण घटक अधिक परिणामकारकपणे शोषले जातात.
हा मास्क रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी धुतल्यावर पापण्या आणि आयब्रो नरम व चमकदार वाटतील.
हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा आणि दररोज वापरा. एका महिन्यात स्पष्ट फरक दिसेल; मात्र केमिकल प्रॉडक्ट्स टाळा आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या.