Navratri 2025 : सौंदर्य, साहस, समृद्धीचे प्रतीक असलेल्या ९ देवींचे पाहा 'अद्भुत रूप'

नेहा जाधव - तांबे

देवीचे पहिले रूप शैलपुत्री. जी पर्वतावर विराजमान असून शुद्धतेची देवी मानली जाते. शैलपुत्री देवी साधना व ज्ञान देते. भक्तांचे मन शांत व सात्विक ठेवणारी पहिली देवी. | (सर्व छायाचित्र - Pintrest)
देवीचे दुसरे रूप ब्राह्मी. जी विद्या आणि बुद्धीची अधिष्ठात्री आहे. चार हात आणि माळ धरलेली, ज्ञानाचा प्रकाश देणारी देवी.
देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा. साहस व भय निवारणारी देवी. जी संकटे दूर करणारी वीरांगना म्हणून ओळखली जाते.
देवीचे चौथे रूप कूष्मांडा. जी सृष्टीची रचयिता म्हणून ओळखली जाते. सर्व प्रकारच्या समृद्धीची जनक असणारी देवी.
स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. प्रेम, माया, ममता आणि संरक्षणाची देवी. हातात शिशु कार्तिकेय असलेली ही देवी मुलांच्या रक्षणाचे प्रतीक.
सहावी देवी कात्यायनी. साहसी आणि संकटनिवारक. सिंहावर आरूढ, आठ हात, अस्त्र-शस्त्र हातात घेणारी. दुर्गा शक्तीची अवतार असून संकट निवारण करते.
सातव्या देवीचे रूप कालरात्रि. अंधकारावर नाश करणारी देवी. भक्तांच्या संकटांचे निवारण करणारी, दुर्जनांचा नाश करणारी देवी.
सौंदर्य, शुद्धता आणि वैभवाचे प्रतीक असलेली आठवी महागौरी देवी. आरोग्य व समृद्धी देणारी. भक्तांचे जीवन आनंदमय आणि वैभवशाली करणारी देवी.
सर्व सिद्धींची अधिष्ठात्री सिद्धिदात्री देवी. आशीर्वाद देणारे हात,ज्ञान, संपन्नता, मोक्ष व सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी ही नववी देवी.