Navratri 2026 : गरब्यासाठी Outfit घेताय? या ७ गोष्टी आधी तपासा

Mayuri Gawade

आउटफिट कितीही सुंदर असला तरी तो कम्फर्टेबल नसेल तर गरब्याचा आनंद कमी होऊ शकतो. नाचताना सहज हालचाल करता येईल असे कपडे निवडा.
हलके फॅब्रिक निवडा - गरबा खेळताना घाम येतो आणि सतत हालचाल होते. त्यामुळे कॉटन, रेयॉन किंवा हलकं जॉर्जेटसारखं ब्रीदेबल फॅब्रिक निवडणं फायदेशीर ठरतं.
लेहेंग्याची लेंथ तपासा - खूप लांब किंवा जमिनीवर लोळणारा लेहेंगा गरबा खेळताना अडथळा ठरू शकतो. पायात अडकणार नाही अशी योग्य लांबी निवडा.
हेवी मिरर वर्क टाळा - जास्त मिरर वर्क किंवा अतिजड एम्ब्रॉयडरी आकर्षक दिसते, पण अनेक तास नाचताना ती त्रासदायक ठरू शकते. शार्प एजेस आहेत का, हेही तपासा.
ब्लाउजची फिटींग योग्या असू द्या - खूप टाइट ब्लाउज किंवा चोलीमुळे हात वर करताना आणि दांडिया खेळताना डिस्कम्फर्ट होऊ शकतो. फिट स्टायलिश असण्यासोबत फ्लेक्सिबलही असावी.
दुपट्टा व्यवस्थित सिक्युअर करा - वारंवार खाली पडणारा दुपट्टा गरब्यात अडथळा आणू शकतो. पिन करता येणारा, हलका किंवा प्री-ड्रेप्ड दुपट्टा निवडणे उत्तम.
फुटवेअर विसरू नका - फक्त आउटफिटवर लक्ष केंद्रित करू नका. कम्फर्टेबल जुत्ती, फ्लॅट्स किंवा कुशन असलेले फुटवेअर निवडा. गरबा खेळताना स्टॅबिलिटी आणि कम्फर्ट दोन्ही महत्त्वाचे आहेत.
आउटफिट घेताना फक्त तो दिसायला सुंदर आहे का हे पाहू नका, तर गरबा खेळताना त्यात तुम्हाला सहज हालचाल करता येईल का हेही तपासा. | All Photos : AI Generated