नवरात्रीच्या उपवासात काय खावं-काय टाळावं? तब्येत बिघडू नये म्हणून लक्षात ठेवा
Mayuri Gawade
नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणार असाल, तर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही, यासाठी योग्य आहार घ्या.
उपवासात साबुदाणा, बटाटा, रताळे, वरीचे तांदूळ आणि राजगिरा यांसारखे पदार्थ खाऊ शकता.
उपवासात राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, दूध आणि दही यांसारखे पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.
उपवासात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून नियमित पाणी प्या आणि ताक, नारळपाणी किंवा लिंबूपाणी यांचाही आहारात समावेश करा.
उपवासात कोणते धान्य खायचे आणि कोणते टाळायचे, हे आपल्या उपवासाच्या पद्धतीनुसार ठरवा.
उपवासात बाजारातील पॅकेटबंद फराळ आणि तळलेले पदार्थ वारंवार खाण्याऐवजी घरच्या घरी कमी तेलात तयार केलेले पदार्थ खा.
उपवासात खूप वेळ काहीही न खाल्ल्याने अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे भूक लागल्यावर योग्य प्रमाणात फराळ किंवा फळे खा.
उपवासात साखर आणि गूळ घातलेले पदार्थ जास्त खाणे टाळा, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
उपवासात फळे, दूध आणि दही यांसारखे पदार्थ खाल्ल्याने शरीराला विविध पोषक घटक मिळतात, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करा. | All Photos : AI Generated