नवरात्रीत उपवासासाठी हेल्दी पदार्थ - शारदीय नवरात्रीत उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा आहारात समावेश करा.
भाजलेले मखाणे - तुपात थोडे भाजलेले मखाणे, सैंधव मीठ आणि काळी मिरी घालून तयार करा कुरकुरीत आणि हलका स्नॅक.
फळे आणि दह्याचा बाऊल - केळी, सफरचंद, डाळिंब आणि साधे दही एकत्र करून तयार करा पौष्टिक नाश्ता किंवा हलका स्नॅक.
पनीर सॅलड - ताज्या भाज्या आणि पनीर एकत्र करून बनवा प्रोटीनयुक्त सॅलड. हलका आणि पोटभर स्नॅक म्हणून हा पर्याय निवडू शकता.
पदार्थ बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा - उपवासात वापरले जाणारे मीठ, मसाले आणि इतर साहित्य आपल्या धार्मिक परंपरेनुसार निवडा. पदार्थ बनवताना तेल आणि साखरेचा अतिरेक टाळा.
शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ - शिंगाड्याचे पीठ, उकडलेला बटाटा आणि उपवासात चालणारे मसाले वापरून बनवा गरमागरम थालीपीठ. दह्यासोबत खाल्ल्यास उपवासाच्या जेवणात चव आणि पौष्टिकतेची भर पडते.
उपवासात आरोग्याचीही घ्या काळजी - दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि फळे, प्रथिने व इतर पोषक घटकांचा आहारात समतोल ठेवा. अशा प्रकारे उपवासातही ऊर्जा टिकवण्यास मदत होऊ शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)