Navratri 2026 : हिरवी माहेश्वरी साडी, लक्ष्मी साज अन् मराठमोळा थाट; जुई गडकरीचा मनमोहक लूक चर्चेत
किशोरी घायवट-उबाळे
नवरात्रीनिमित्त अभिनेत्री जुई गडकरीने हिरव्या रंगातील सुंदर पारंपरिक लूकचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गडद हिरव्या रंगाच्या माहेश्वरी साडीत जुईचा ग्रेसफुल अंदाज पाहायला मिळत आहे.
रेशीम आणि सूती धाग्यांपासून विणलेली हलकी माहेश्वरी साडी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
साडीच्या नाजूक सोनेरी काठामुळे तिच्या लूकला एक वेगळीच शाही झळाळी मिळाली आहे.
गळ्यातील पारंपरिक लक्ष्मी साज, हिरवा चुडा आणि कानातील कर्णफुलांनी जुईचा मराठमोळा साज अधिक खुलला आहे.
हिरव्या रंगाची समृद्धता आणि सोनेरी दागिन्यांची नजाकत यांचा सुंदर मिलाफ तिच्या लूकमध्ये पाहायला मिळतो.
समृद्धी, चैतन्य आणि सृजनाचे प्रतीक असलेल्या हिरव्या रंगातील जुईचा हा लूक नवरात्रीच्या रंगोत्सवासाठी खास ठरत आहे.
सध्या 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी जुई गडकरी आपल्या या पारंपरिक लूकमुळे पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.