Navratri 2026 : मयुरी देशमुखचा मोरपंखी पैठणी लूक; मराठमोळ्या सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

किशोरी घायवट-उबाळे

नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने आपल्या सुंदर पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'खुलता कळी खुलेना' या 'झी मराठी'वरील मालिकेतून मयुरी घराघरांत पोहोचली आणि तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
नवरात्रीचे औचित्य साधत मयुरीने सोशल मीडियावर आपल्या फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मयुरीने परिधान केलेली मोरपंखी रंगाची रेशमी पैठणी साडी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
पारंपरिक पैठणी साडीसोबत तिने मोत्यांचे दागिने परिधान केले असून, यामुळे तिच्या लूकला शाही आणि देखणा अंदाज मिळाला आहे.
नाकातील पारंपरिक नथ आणि कानातील आकर्षक झुमके यांमुळे मयुरीचा मराठमोळा लूक अधिक खुलून दिसत आहे.
तिच्या या पारंपरिक रूपातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून, कमेंट्समधून अनेकजण तिच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे कौतुक करत आहेत.
नवरात्रीत पारंपरिक साडी लूक करण्याचा विचार करत असाल, तर मयुरी देशमुखची मोरपंखी पैठणी आणि दागिन्यांची स्टाइल नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.