Navratri 2026 : पांढरी साडी, निळा काठ अन् पारंपरिक दागिने; शर्मिष्ठाचा नवरात्री स्पेशल लूक एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

नवरात्रीचा पांढरा रंग आणि शर्मिष्ठाचा मराठमोळा अंदाज तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठाने आपल्या पारंपरिक लूकमधून सौंदर्याची खास छाप पाडली आहे.
'बिग बॉस मराठी'मधील दमदार परफॉर्मन्स आणि मराठी मालिकांमधील लक्षवेधी भूमिकांमुळे शर्मिष्ठाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे
अभिनयासोबतच निर्माती म्हणूनही यशस्वी वाटचाल करणाऱ्या शर्मिष्ठाचा हा पारंपरिक लूक विशेष लक्ष वेधून घेतो.
नवरात्रीच्या पांढऱ्या रंगाला निर्मळता, शुद्धता आणि शांततेचे प्रतीक मानले जाते.
शर्मिष्ठाने पांढऱ्या रंगाची सुंदर इरकल साडी नेसली असून, त्यावरील निळ्या टेंपल बॉर्डरमुळे साडीला खास पारंपरिक उठाव मिळाला आहे.
कानात कुड्या, बुगडी, नाजूक नथ आणि गळ्यातील चोकर यांमुळे शर्मिष्ठाचा पारंपरिक साज अधिकच खुलून दिसतो.
भरीव बांगड्यांची साथ आणि दागिन्यांची सुंदर निवड यामुळे तिचा Royally Elegant Look अगदी उठून दिसतो.
शांत हास्य आणि सौंदर्य यांचा मिलाफ असलेला शर्मिष्ठाचा हा मराठमोळा अंदाज नवरात्रीच्या पांढऱ्या रंगाला एक वेगळीच शोभा देतो.