मानेचा काळपटपणा घालवायचाय? 'या' घरगुती उपायांनी दिसेल फरक

किशोरी घायवट-उबाळे

लिंबू व मध १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिसळून मानेला लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. | (सर्व फोटो : Yandex)
बटाट्याचा रस बटाट्याचा रस काढून कापसाने मानेवर लावा आणि २० मिनिटांनी धुवा.
कोरफड जेल ताजे कोरफड जेल रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावा आणि सकाळी धुवा.
तांदळाचे पीठ व दूध १ चमचा तांदळाचे पीठ आणि दूध मिसळून आठवड्यातून २ वेळा स्क्रब करा.
नारळ तेल व लिंबू रस १ चमचा नारळ तेल आणि काही थेंब लिंबाचा रस मिक्स करून १० मिनिटे मसाज करून धुवा.
स्वच्छता व सनस्क्रीन रोज मान स्वच्छ धुवा आणि बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. मानेवर दुर्लक्ष करू नका.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)