लॅपटॉपवर काम करताना मान दुखतेय? करा 'हे' सोपे उपाय

किशोरी घायवट-उबाळे

स्क्रीन डोळ्यांच्या समोर ठेवा. लॅपटॉप खूप खाली ठेवल्यामुळे मान वाकते आणि दुखते. | (सर्व छायाचित्रे- Yandex)
मान सरळ ठेऊन बसण्याची सवय लावा. सतत पुढे झुकून बसल्यास मानेवर ताण येतो.
दर ३०-४५ मिनिटांनी ब्रेक घ्या. थोडा वेळ उभे राहा आणि मान हलवा.
मानेला स्ट्रेचिंग व्यायाम करा. हलके स्ट्रेच केल्याने वेदना कमी होतात.
योग्य खुर्चीचा वापर करा. पाठ आणि मानेला आधार मिळेल अशी खुर्ची महत्त्वाची ठरते.
उशी किंवा नेक सपोर्ट वापरा. यामुळे काम करताना मानेचा ताण कमी होतो.
वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. मान सतत दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)