चष्म्यामुळे येणारे डाग हटवायचे आहेत? मग ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Rakesh Mali

चष्म्यामुळे नाक आणि डोळ्यांच्या येथे येणारे डाग दूर करायचे असल्यास कोरफडच्या आतील गर काढून तो डोळे आणि आजूबाजूच्या त्वचेवर लावा. जेणेकरून चेहऱ्यांवरील पुटकुळ्या किंवा डाग दूर होण्यास मदत होईल.
यामधील दुसरा उपाय म्हणजे संत्र्यांच्या साली सुखवून त्या वाटून घ्या. त्यानंतर जी पावडर तयार होईल त्यात दूध मिसळून ती पेस्ट चेहऱ्याला लावा. असे केल्याने चेहरा तजेलदार आणि डाग कमी करण्याचे काम करेल.
चष्म्यामुळे येणारे डाग हटवण्यासाठी आणखी एक उपाय करु पहा. बटाटा किसून घ्या. त्यातून रस काढून टाका आणि तो डाग आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे डाग दूर होण्यास मदत होईल.
मधात ओट्स आणि दूध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांच्या खाली किंवा डाग आलेल्या ठिकाणी लावून १० मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुतल्यास डाग येण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.
जर तुम्हाला चष्मा नुकताच लागला असेरल आणि तरीही तुम्ही सातत्याने वापरत असाल तर गुलाबपाणी कापसावर घेऊन ते डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. कारण गुलाबपाणी हे एक नॅच्युरल टोनर असून ते डाग दूर करण्यास मदत करते.