Neha Gadre : 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय? ७ वर्षांनी भारतात परतली, कमबॅकसाठी म्हणाली...
Mayuri Gawade
'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा गद्रे आठवतेय? तिच्या निरागस अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
टेलिव्हिजनवर लोकप्रियता मिळत असतानाच नेहाने अभिनयातून ब्रेक घेतला आणि लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
२०१९ मध्ये नेहाने ईशान बापटशी लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर ती ऑस्ट्रेलियात राहू लागली.
ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर नेहाने अभिनयापासून दूर राहत नवीन आयुष्याला सुरुवात केली. दीड वर्षांपूर्वी ती आईदेखील झाली.
तब्बल सात वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्यानंतर नेहा आता कायमची भारतात परतली आहे. तिने स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, "मी खरंच कायमची भारतात परत आले आहे. मी आता पुन्हा काम करायला तयार आहे."
नेहाने निर्माते आणि दिग्दर्शकांनाही खास संदेश दिला आहे. "सर्व निर्माते, दिग्दर्शकांनाही मला हेच सांगायचंय की मी आता भारतातच आहे," असं ती म्हणाली.
अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची काही काळापूर्वी नेहाने भेट घेतली होती. त्यांच्या सिनेमात तिने एक छोटी भूमिकाही साकारली आहे.
ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर नेमकं काय करायचं, हा प्रश्न नेहासमोर होता. अभिनय शक्य नसल्याने तिने शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला.
नेहाने ऑस्ट्रेलियात अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअरमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा केला. त्यानंतर चार वर्षे तिने तिथे अर्ली चाइल्डहुड टीचर म्हणून मुलांना शिकवलं.