रात्री झोपताना केस बांधायचे की मोकळे ठेवायचे? केस तुटत असतील तर 'या' चुका टाळा

Mayuri Gawade

रात्री झोपताना केस घट्ट बांधण्याऐवजी केसांवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
घट्ट रबरने केस बांधून झोपल्यास केसांच्या मुळांवर सतत ताण येऊ शकतो आणि केस तुटण्याची शक्यता वाढू शकते.
रात्री झोपताना घट्ट आंबाडा बांधणे किंवा क्लॉ क्लिप लावणे टाळा, कारण त्यामुळे केसांवर अनावश्यक ताण आणि घर्षण होऊ शकते.
केस लहान असतील तर ते मोकळे ठेवून झोपता येते, मात्र लांब केसांसाठी झोपताना घर्षण कमी होईल याची काळजी घेणे चांगले.
लांब केस असतील तर झोपण्यापूर्वी सैलसर वेणी घालणे हा केसांचा गुंता आणि घर्षण कमी करण्याचा सोपा पर्याय ठरू शकतो.
वेणी खूप घट्ट बांधू नका आणि केस बांधण्यासाठी मऊ सॅटिन किंवा सिल्कचे कापड वापरल्यास घर्षण कमी होण्यास मदत होऊ शकते.
झोपण्यापूर्वी केस हळुवारपणे विंचरून त्यातील गुंता सोडवा, त्यामुळे केस ओढले जाणे आणि तुटणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
केसांना रात्री सतत घर्षण होऊ नये यासाठी सॅटिन किंवा सिल्कचे हेअर कव्हर वापरण्याचाही पर्याय निवडता येतो.
केसांची निगा राखताना घट्ट बांधण्यापेक्षा सैलसर वेणी आणि सौम्य काळजी घेणे अधिक योग्य ठरू शकते. | All Photos : AI Generated