सरोजिनी नायडू 'Nightingale of India' यांच्याबद्दल या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Kkhushi Niramish

सरोजिनी नायडू यांची आज जयंती. १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथील एका बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण हैदराबाद, किंग्ज कॉलेज, लंडन आणि गिर्टन कॉलेज, केंब्रिज येथे झाले. | @Naveen_Odisha
सरोजिनी नायडू या उत्कृष्ट कवयित्री होत्या. वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता. त्यांना महात्मा गांधी यांनी 'nightingale of India' असे म्हटले होते | @kharge
देशातील स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास पत्करला. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी २१ महिने तुरुंगवास भोगला. | @rishi_baruah
त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने टपाल तिकीट जारी केले होते. | @IndiaPostOffice
१९२५ मध्ये त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. १९२३ ते १९२९ या दरम्यान त्या बॉम्बे म्यूनिसिपल कॉर्पोरेशनच्या सदस्य राहिल्या. भारतीय राज्यघटना निर्मितीत सहभाग, स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. | @Dev_Fadnavis
त्यांनी महिलांचा विकास व्हावा, महिलांची परिस्थिती सुधारावी यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. 2 मार्च १९४९ ला लखनऊ येथे हृदयविकाराच्या झटक्याने सरोजिनी यांचे निधन झाले. | @nitin_gadkari
त्यांच्या सन्मानार्थ आज त्यांच्या जन्मदिनी भारतीय राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो. | @KrishnaFauji