Budget 2024 साठी निर्मला सीतारामन यांनी नेसली 'टसर सिल्क' साडी, किंमत किती?

Rutuja Karpe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, यावेळी त्यांनी नेसलेल्या साडीने लक्ष वेधले. सोशल मीडियावर या साडीची चर्चा होत आहे.
सीतारामन यांनी क्रीम रंगाच्या ब्लाऊजसह निळ्या रंगाच्या सिल्क साडीवर गोल्डन रंगाची शॉल परीधान केली होती. या साडीला टसर सिल्क साडी असे म्हणतात.
टसर सिल्क या प्रकारच्या साड्या पूर्व भारतातील विविध भागांमध्ये उपलब्ध असतात, मात्र बंगालमधील मालदा जिल्ह्यात या साड्या जास्त प्रमाणात तयार केल्या जातात.
ही साडी तूती रेशीम पासून तयार केली आहे. काही रिपोर्ट्सनुसार या साडीची किंमत बाजारात 5000 ते 10000 हजार रुपये इतकी आहे.