भारतीय वस्त्रपरंपरेचा साज; बनारसी साडीत नीता अंबानींचा खास लूक, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

नीता अंबानी यांनी फॉर्च्युन इंडियाच्या 'मोस्ट पॉवरफुल वुमन २०२६' यादीत प्रथम क्रमांक पटकावला. रिलायन्स फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा यामागे मोठा वाटा आहे.
या खास सोहळ्यासाठी त्यांनी फिकट गुलाबी रंगाची बनारसी रेशमी साडी परिधान केली. भारतीय वस्त्रपरंपरेचा साज आणि आधुनिक सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ या लूकमध्ये दिसला.
ही हातमागावर विणलेली साडी वाराणसीतील प्रसिद्ध 'गुलाब होळी' उत्सवातून प्रेरित आहे. साडीवरील नाजूक फुलांची नक्षी तिचे वैशिष्ट्य ठरली.
डायमंड दागिने, बन आणि हलका मेकअप यामुळे नीता अंबानींचा लूक अधिक खुलला. एलिगंट स्टाइलमुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आरुषी लोहिया आणि कृष्णा लोहिया या कारागिरांनी ही साडी दोन महिन्यांच्या मेहनतीत विणली. बनारसच्या समृद्ध विणकाम परंपरेचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो.