नखांना वाढ नाही? कमजोर नखांच्या समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!

Swapnil S

स्त्रियांची लांब नखे त्यांच्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात. परंतु, काही लोकांची नखे इतकी कमकुवत असतात की, त्यांची वाढ होताना ती तुटतात. त्याच वेळी, काही लोकांची नखे वाढतच नाही, अशा अनेक समस्या उद्भवत असतात. नखांच्या कमकुवतपणामुळे आपल्या हातांच्या सौंदर्यावर तसेच, आरोग्यावरही परिणाम होत असतो.
जर आपल्याला अंड्यांपासून काही अॅलर्जी नसेल तर, अंड्यातील पांढरा भाग नखांसाठी खूप उपयुक्त ठरेल. या पांढऱ्या भागात दूध घालून व्यवस्थित फेटून घ्या. या मिश्रणामध्ये नखे किमान 10 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे नखांना योग्य पोषण मिळेल आणि काही दिवसातच नखे मजबूत होऊन, वाढू लागतील.
संत्रे किंवा मोसंबीच्या रसात नखं 10 मिनिटे बुडवा, नंतर कोमट पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. संत्री आणि मोसंबीमध्ये व्हिटामिन सी असते, जे नखांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे नखे चमकदार होतात आणि वेगाने वाढू लागतात
जर तुम्ही नखांची पुरेशी काळजी घेऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने किमान 15 मिनिटे नखांची मालिश करा. यामुळे आपले नखे चमकदार होतील आणि वेगाने वाढू लागतील. | PM
तीन चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण थोडेसे गरम करा. तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये किमान पंधरा मिनिटे नखे बुडवून ठेवा. हा उपाय केल्याने काही दिवसात त्याचा प्रभाव दिसण्यास सुरू होईल. आपण नखांवर बदाम तेलाची मालिश देखील करू शकता.