Sunday Special Recipe : पौष्टिक आणि स्वादिष्ट शेवग्याचे सूप तुमचा रविवार बनवेल खास
Kkhushi Niramish
शेवग्याचे पौष्टिक आणि स्वादिष्ट सूप करण्यासाठी प्रथम शेवगाच्या शेंगा धुवून त्याचे तुकडे करून पाण्यात उकडून घ्या. शेवगा उकडत असतानाच त्यात मीठ घाला. | All Photo - You Tube Short - @pradnyaskitchen17
उकळलेल्या या शेंगांमधून आतील मऊ भाग चमच्याने किंवा हातांनी काढून घ्या.
वेगळा केलेला हा भाग चांगला स्मॅश करून घ्या.
आता मिक्सरमध्ये शेवग्याच्या शेंगाचे पाणी घालून याची छान पातळ पेस्ट करून घ्या.
ही पेस्ट पाण्यात टाकून पुन्हा उकळायला ठेवा.
आता यामध्ये काळीमिरी पूड घाला. काळीमिरी ही आरोग्यदायी असते. याशिवाय यामुळे एक छान स्वाद येईल.
तिखट आवडत असल्यास काळीमिरीसोबत लाल तिखटही घाला.
आता यामध्ये थोडा लिंबू पिळून त्याचा रस घाला आणि उकळू द्या.