नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं? Oats पासून ट्राय करा 'या' टेस्टी डिश

किशोरी घायवट-उबाळे

ओट्समध्ये उकडलेले बटाटे, भाज्या आणि मसाले मिसळून स्वादिष्ट कटलेट तयार करता येतात.
ओट्सचे पीठ, भाज्या आणि मसाले वापरून झटपट चविष्ट आणि पौष्टिक धिरडे बनवता येतात.
रवा किंवा तांदळाऐवजी ओट्स वापरून मऊ आणि हलकी इडली तयार करता येते.
नेहमीच्या उपम्याला हेल्दी ट्विस्ट द्यायचा असेल तर भाज्या आणि ओट्स वापरून झटपट उपमा बनवा.
ओट्सच्या पिठापासून कुरकुरीत डोसा बनवता येतो. नाश्त्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
ओट्सपासून हलका आणि स्पॉंजी ढोकळा बनवून संध्याकाळच्या स्नॅक्सची चव वाढवता येते.
ओट्सचे पीठ गव्हाच्या पिठासोबत मिक्स करून भाज्या घालून पौष्टिक पराठे तयार करता येतात.
ओट्स, दूध किंवा दही, केळं आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून झटपट स्मूदी तयार करता येते.