केस गळणे कमी करण्यासाठी कांद्याचा रस वापरता? आधी हे वाचा

Mayuri Gawade

केस गळत असतील तर सर्वात आधी आठवतो तो कांद्याचा रस! पण खरंच तो केसांच्या वाढीस मदत करतो का?
कांद्याच्या रसात सल्फर भरपूर प्रमाणात असतं. हेच घटक केसांना मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
केस मुख्यतः केराटिन या प्रोटीनपासून बनलेले असतात. केराटिनमध्ये सल्फर असल्याने केस तुटणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
कांद्याचा रस टाळूतील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करू शकतो. त्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळू शकतं.
काही संशोधनांमध्ये कांद्याच्या रसामुळे केसांची वाढ दिसून आली आहे. मात्र यावर अजूनही अधिक अभ्यासाची गरज आहे.
महत्त्वाचं म्हणजे, कांद्याचा रस हा टक्कल पडण्यावरील कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवू नका.
कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने स्काल्पवर लावा. 20 ते 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा.
खोबऱ्याचं तेल किंवा अॅलोव्हेरा जेल मिसळल्यास टाळूवरील जळजळ आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच रस धुवा. संवेदनशील त्वचा असेल तर आधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. | All Photos : Ai Generated