टॅनिंग-पिंपल्स होतील गायब! संत्र्याच्या सालीचा ‘हा’ घरगुती उपाय करून बघा
Mayuri Gawade
दमट हवामान, प्रदूषण आणि बदलत्या ऋतूमुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि तेलकट होते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
अशावेळी बाजारातील केमिकलयुक्त क्रीम्सऐवजी घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात.
संत्र्याच्या सालीत असलेलं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील टॅनिंग, डाग आणि पिंपल्स कमी करतात.
फक्त काही घटकांपासून हा नैसर्गिक फेसपॅक बनवता येतो.
संत्र्याची साल बारीक वाटून त्यात दही, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद मिक्स करा.
चेहऱ्यावर आणि मानेवर हा पॅक १५ मिनिटं लावून ठेवा, नंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने धुवा.
आठवड्यातून दोनदा वापरल्यास चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होऊन त्वचा उजळ, मऊ आणि ग्लोइंग दिसते.
रासायनिक क्रीम्सपेक्षा हा नैसर्गिक उपाय त्वचेचं सौंदर्य दीर्घकाळ टिकवतो.