नारंगी, हिरवा की ट्रान्सपरंट? गॅस शेगडीसाठी कोणता पाईप सर्वात सुरक्षित, जाणून घ्या
Mayuri Gawade
गॅस बंद करणे आणि रेग्युलेटर तपासणे जितके महत्त्वाचे, तितकीच गॅस पाईपची निवडही गरजेची आहे.
ट्रान्सपरंट पाईप स्वस्त असला तरी तो सर्वात धोकादायक मानला जातो.
प्लास्टिकचा ट्रान्सपरंट पाईप उष्णतेमुळे कडक होऊन त्याला तडे जाण्याची शक्यता असते.
उंदीर सहज कुरतडू शकतात म्हणून ट्रान्सपरंट पाईपमुळे गॅस लीकचा धोका वाढतो.
हिरवा पाईप अनेक घरांत वापरला जातो, पण तो गॅसचा उच्च दाब सहन करण्यासाठी बनवलेला नसतो.
उष्णता आणि तेलकटपणामुळे हिरवा पाईप सैल होऊन शेगडीच्या नॉबमधून निघू शकतो.
ऑरेंज रंगाचा 'सुरक्षा एलपीजी होज' ISI प्रमाणित असल्याने सर्वाधिक सुरक्षित पर्याय मानला जातो.
स्टीलच्या जाळ्यामुळे ऑरेंज पाईप उंदीर, आग आणि गॅस लीकपासून अतिरिक्त संरक्षण देतो.
गॅस पाईप नेहमी ISI मार्क असलेलाच घ्या, तो उघडा ठेवा आणि सुरक्षिततेसाठी दर २ ते ३ वर्षांनी बदला. | all photos : ai generated