झोपेतही फॅट बर्न? रात्री करा 'हे' महत्त्वाचे बदल
किशोरी घायवट-उबाळे
झोपण्यापूर्वी हलका आहार घ्या -रात्री जड, तेलकट अन्न टाळल्यास शरीराला फॅट बर्न प्रक्रियेसाठी वेळ मिळतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पुरेशी झोप घ्या - पुरेशी ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
योगा / स्ट्रेचिंग - ५ ते१० मिनिटे सौम्य योगा (स्पाइनल ट्विस्ट) केल्याने ताण कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं. यामुळे झोप चांगली लागते.
काकडी-पुदिना-लिंबू डिटॉक्स ड्रिंक -हे मिश्रण शरीरातील टॉक्सिन्स कमी करून पचन सुधारण्यास मदत करू शकते.
दीर्घ श्वास घ्या - झोपण्यापूर्वी ५ मिनिटे दीर्घ श्वसन केल्याने तणाव कमी होतो आणि रात्री अनावश्यक खाण्याची सवय कमी होते.
झोपण्याआधी कोमट पाणी प्या -यामुळे पचन सुधारून शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांना चालना मिळते.
स्क्रीन टाइम कमी करा - मोबाईल/टीव्ही टाळल्यास हार्मोन संतुलन सुधारतं आणि वजन नियंत्रणास मदत होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)