Navratri Look 2025 : ऑक्सिडाइज ज्वेलरीने तुमच्या लूकला द्या परंपरेचा ट्विस्ट!

नेहा जाधव - तांबे

नवरात्रीमध्ये उठून दिसायचं असेल, तर घागरा-चोळीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी एकदम शोभून दिसते, आणि तुमच्या लूकला एक परफेक्ट पारंपारिक टच देते. | (Photo - Insta/Britney.khaturlya)
साडी, घागरा किंवा जीन्स-कुर्तीवर, ऑक्सिडाइज लांबलचक नेकलेस नेहमीच ट्रेंडी लूक देतो आणि तुमच्या स्टाइलमध्ये एक वेगळीच चमक आणतो. | ( All Photo - Insta/Oxidised_world2020)
स्त्रियांचा सर्वात आवडता दागिना म्हणजे झुमके. नवरात्रीतील कोणत्याही पोषाखावर ऑक्सिडाइज झुमके पारंपारिक साज आणतात, जे तुमच्या लूकला एक अनोखा आकर्षक स्पर्श देतात.
अलीकडे बोटांची शोभा वाढवणारी अंगठी ट्रेंडमध्ये आहे, विशेषतः ऑक्सिडाइज मोराची डिझाईन असलेली अंगठी. यासोबतच श्री कृष्ण, मोरपिस, आणि बासरी असलेल्या अंगठ्या देखील अत्यंत शोभून दिसतात.
नेहमीचे कानातले घालून कंटाळला असाल, तर नवीनतम ट्रेंडिंग मून मोटिफ सिल्व्हर इअरकफ नवरात्री लूकसाठी उत्तम पर्याय आहेत.
चांदीच्या साखळ्या पायांची शोभा वाढवतात. हल्ली Anklets with Toe Rings या नव्या ट्रेंडने वेस्टर्न आउटफिट्सला पारंपारिक टच दिला आहे.
काळ्या धाग्यात ओवलेल्या सिल्व्हर मण्यांच्या नेकलेसचे ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये एक खास स्थान आहे. त्यावरील रंगीत हिऱ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे हा नेकलेस कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर एकदम शोभून दिसतो.
बुगडी ही महाराष्ट्राची परंपरा असली, तरी नाजुकशा बुगडीने आता नवा अवतार घेतला आहे. 'बासरी विथ कृष्णा' डिझाइन आणि नवे बुगडी प्लस कानतले, नवरात्रीच्या उत्सवात वेगळेपण आणि आकर्षण आणतात.
ऑक्सिडाइज सिल्व्हर बटरफ्लाय हाथफूल, तुमच्या एथनिक लूकला नवा आयाम देईल. सुंदर फुलपाखरं आणि नाजूक फुलांची रचना, मनगटावर आकर्षक स्पर्श देईल.