साडी, ट्यूब ब्लाऊज अन् मनमोहक स्मित; पल्लवी पाटीलचा लूक सोशल मीडियावर व्हायरल

किशोरी घायवट-उबाळे

डिझायनर साडीत वेधलं लक्ष : पल्लवी पाटीलने ट्यूब ब्लाऊजसह डिझायनर साडी परिधान करत हटके फोटोशूट केले. तिच्या या एलिगंट लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. | (All Photos : Instagram)
मिनिमल मेकअपने खुललं सौंदर्य : हलका बेस, न्यूड लिपस्टिक आणि सॉफ्ट आय मेकअपमुळे तिचा नैसर्गिक ग्लो अधिक उठून दिसला. साधेपणातही तिने स्टायलिश लूक साकारला.
स्मित हास्याने जिंकली चाहत्यांची मनं : पल्लवीच्या आत्मविश्वासपूर्ण स्मित हास्यामुळे प्रत्येक फोटो अधिक आकर्षक वाटला. तिच्या पोझचेही चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.
कमी दागिन्यांतही क्लासी स्टाइल : गळ्यात नाजूक नेकलेस, हातात ब्रेसलेट अशा मिनिमल ॲक्सेसरीजची तिने निवड केली. त्यामुळे साडीचा लूक अधिक उठावदार दिसला.
केसांनी वाढवली आकर्षकता : मोकळे केस आणि साइड पार्टिंगमुळे तिच्या लूकला ग्लॅमरस टच मिळाला. हेअरस्टाइलने तिचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव : पल्लवीच्या या नव्या फोटोशूटला अल्पावधीत हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या. Beautiful आणि Elegant Queen अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.