पनीर, अंडी की चिकन? सर्वाधिक प्रोटीनचा स्त्रोत कोणता?
Krantee V. Kale
पनीर, अंडी आणि चिकन हे सर्व आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. या तिन्ही पदार्थांना प्रोटीनचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. | All Photos- yandex
म्हणूनच, बहुतेक लोक या तीनपैकी एका पदार्थाचा त्यांच्या आहारात निश्चितपणे समावेश करतात.
अनेकांना असा प्रश्न पडतो की, अंडी, चिकन आणि पनीर यापैकी कोणत्या पदार्थात जास्त प्रोटीन असतात आणि कोणते पदार्थ खाणे जास्त फायदेशीर ठरेल, चला तर जाणून घेऊयात.
१०० ग्रॅम पनीरमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते. पनीरमधील प्रोटीन हळूहळू पचतात आणि हळूहळू संपूर्ण शरीरात रिलीज होतात.
पनीर खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच, यामध्ये कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे पनीरला प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जाते.
दोन अंड्यांमध्ये, अंदाजे १३ ग्रॅम प्रोटीन असते. अंड्यातील प्रोटीन उच्च दर्जाची असतात. WHO आणि पोषणतज्ज्ञ अंड्यांना "गोल्ड स्टँडर्ड प्रोटीन" म्हणतात कारण अंड्यातील प्रोटीन शरीरात सहज शोषले जातात.
१०० ग्रॅम चिकनमध्ये ३० ते ३२ ग्रॅम प्रोटीन असते. म्हणून चिकनला प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत मानतात. परंतु, पनीर आणि अंड्याच्या तुलनेत चिकनला पचण्यासाठी जास्त वेळ लागतो.
तुमच्या शरीरातील प्रोटीनच्या गरजेनुसार तुम्ही चिकन, अंडी किंवा पनीर खाऊ शकता.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)