शांती, समृद्धी आणि सौख्य वाढवणारी 'ही' खास वास्तुचित्रे तुमच्या घरासाठी!
नेहा जाधव - तांबे
वास्तुशास्त्रानुसार, घोड्याचे चित्र शक्ती, यश, शांती आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भिंतीवर लकी ७ घोड्याचे चित्र असेल, तर सौभाग्य प्राप्त होते. हे चित्र नेहमी दक्षिण भिंतीवर असावे. | (Photo - Canva)
कमळाचे चित्र घरात सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा आणते. उथळ पाण्यावर तरंगणारे गुलाबी कमळाचे फूल पवित्रता आणि कृपेचे प्रतीक मानले जाते. | (Photo - Canva)
मोर शक्ती, वेग, चैतन्य आणि यशाचे प्रतीक आहेत, आणि ते राहू ग्रहाच्या दुष्परिणामांना निष्क्रिय करतात. मोरांचे चित्र दक्षिण दिशेला लावल्याने पैशाचा प्रवाह सुनिश्चित होतो आणि घरात समृद्धी येते. | (Photo - Canva)
घरात बुद्ध चित्रे शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. ध्यानधारणेच्या स्थितीत बुद्धाचे चित्राने शांती आणि समृद्धी मिळते. हे चित्र पूर्व, उत्तर किंवा ईशान्य भिंतीवर योग्य ठरतात. | (Photo - Canva)
वाहते पाणी संपत्तीचा प्रवाह दर्शवते, त्यामुळे धबधबा किंवा वाहत्या नदीचे चित्र घरात ठेवणे आर्थिक समृद्धी आणि नशीब वाढवते. पाण्याशी संबंधित चित्रे ईशान्य दिशा भिंतीवर ठेवणे अधिक प्रभावी ठरते. | (Photo - Canva)
पर्वतांची चित्रे भाग्य आणि स्थिरता वाढवतात, आणि विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यावसायिकांसाठी शुभ मानली जातात. पर्वतांची चित्रे अभ्यासिका, बेडरूम किंवा बैठकीच्या खोलीत लावली जाऊ शकतात. | (Photo - Canva)
घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याने शांती आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. गणेशाची चित्रे ईशान्य दिशेत ठेवणे आदर्श मानले जाते. | (Photo - Canva)
कोई माशाचे चित्र भाग्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, हे शुभ चित्र आग्नेय भिंतीवर लावल्याने संपत्तीचा कोपरा सामर्थ्यवान होतो. | (Photo - Canva)