प्रत्येक भाजीत दाण्याचा कूट घालता? रोजची सवय ठरू शकते त्रासदायक; 'या' लोकांनी आवर्जून टाळा!

Mayuri Gawade

शेंगदाण्याचा कूट आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो प्रत्येक भाजीत घालणं योग्य आहेच असं नाही. प्रमाणापेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ल्यास काही जणांना अपचन, पोट फुगणे आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
शेंगदाण्यांमध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रोज आणि मोठ्या प्रमाणात दाण्याचा कूट खाल्ल्यास काही लोकांना पित्त, जळजळ किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो.
शेंगदाण्यांमुळे काही व्यक्तींमध्ये ॲलर्जीची लक्षणं वाढू शकतात. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यानंतर खाज, सूज किंवा इतर ॲलर्जीची लक्षणं जाणवत असतील, तर त्यांचं सेवन काळजीपूर्वक करावं.
प्रत्येक भाजीत दाण्याचा कूट घालण्याची सवय असल्यास पोट फुगण्याचा त्रासही जाणवू शकतो. अशावेळी काही दिवस दाण्याचं प्रमाण कमी करून शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहता येऊ शकतं.
कोलेस्टेरॉलचा त्रास असणाऱ्यांनी शेंगदाण्यांच्या सेवनाच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्यावं. आहारात शेंगदाण्यांचा अतिप्रमाणात समावेश करणं टाळणं योग्य ठरू शकतं.
दम्याचा त्रास असणाऱ्यांनी शेंगदाणे खाताना विशेष काळजी घ्यावी. शेंगदाण्याची ॲलर्जी असल्यास गंभीर प्रतिक्रिया होऊ शकते, त्यामुळे लक्षणं जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
शेंगदाणे पूर्णपणे वाईट नाहीत; त्यांचं प्रमाण महत्त्वाचं आहे. शेंगदाण्यांमधून प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मँगनीज यांसारखे अनेक पोषक घटक मिळतात.
मात्र रोज प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचा कूट घालण्याची गरज नाही. आहारात शेंगदाण्यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांचा फायदा घेता येतो.
प्रत्येक भाजीत दाण्याचा कूट घालण्याचं प्रमाण काही दिवस कमी करून पाहा आणि शरीराला काही फरक जाणवतो का ते लक्षात घ्या. विशेष त्रास असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. | All Photos : AI Generated