तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? फॉलो करा सोप्या टिप्स

Krantee V. Kale

सतत फोन वापरल्याने बॅटरी लवकर संपते. परंतु, अनेकदा मोबाईल वापरत नसतानाही बॅटरी लवकर संपते. | All Photos- yandex
जर तुमच्याही मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल, तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरुन बॅटरी लाइफस्पॅन वाढवू शकता.
स्क्रीन सर्वात जास्त बॅटरी वापरते, जर तुम्ही ब्राइटनेस जास्त ठेवला तर बॅटरी लवकर संपेल, म्हणून ऑटो ब्राइटनेस मोड चालू ठेवण्याचा प्रयत्न करा.
जीपीएस, ब्लूटूथ आणि लोकेशन सर्व्हिसेस सारखी फीचर्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहिल्याने बॅटरी लवकर संपते. जर तुम्हाला या फीचर्सची आवश्यकता नसेल तर बंद करा.
फोनमध्ये इन्स्टॉल केलेले अॅप्स दिवसभर नोटिफिकेशन पाठवत राहतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. यासाठी नोटिफिकेशन सेटिंग बंद करा.
जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल, तर बॅटरी सेव्हर मोड चालू करा.
बॅकग्राउंड फीचर्स आणि अॅप्स बंद करा. बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अॅप सतत डेटाचा वापर करतात. ज्यामुळे बॅटरी लवकर संपते.
ऑलवेज-ऑन डिस्प्लेसारखे फीचर्स बंद ठेवा. यामुळे बॅटरी जास्त वेळ टिकेल.
या सोप्या टिप्स वापरुन तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी लाइफ सुधारु शकता.