पितृपक्षात काय खावं-काय टाळावं? पोट आणि तब्येत निरोगी ठेवण्यासाठी 'हे' नियम लक्षात ठेवा

Mayuri Gawade

पितृपक्षाच्या काळात हवामानात बदल होत असल्याने पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या दिवसांत हलका आणि पचायला सोपा आहार घेणं फायदेशीर ठरू शकतं.
या काळात मूग डाळ आणि तांदळासारखे हलके पदार्थ आहारात घेता येतात, तर हरभरा डाळ आणि बेसनाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं टाळणं योग्य ठरू शकतं.
दूध, तांदूळ आणि गूळ किंवा साखरेपासून तयार केलेली खीर हा या काळातील पारंपरिक पदार्थ असून, ती योग्य प्रमाणात घेतल्यास आहारात सहज सामावता येते.
खीर-पुरी किंवा तळलेले पदार्थ परंपरेनुसार जेवणात असले तरी ते जड असल्याने प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.
ताक, लिंबूपाणी किंवा जिऱ्याचं पाणी यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश केल्याने दिवसभर शरीराला द्रव मिळण्यास मदत होते.
पितृपक्षात शक्यतो ताजं शिजवलेलं, कमी मसाल्याचं आणि हलकं अन्न घेतल्यास पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेता येते.
काकडी, दुधी भोपळा आणि हंगामी फळांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला फायबर आणि पाण्याचं प्रमाण मिळण्यास मदत होऊ शकते.
रात्रीचं जेवण शक्यतो लवकर आणि हलकं घेतल्यास झोपण्यापूर्वी पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि पोटावर अनावश्यक ताण पडत नाही.
एकावेळी भरपूर खाण्याऐवजी प्रमाणात आहार घेऊन दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्यास बदलत्या हवामानात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होऊ शकते. | All Photos : AI Generated